Posts

बीडमध्ये पोलीस कुटुंबांसाठी साकारतेय सुविधायुक्त उद्यान

Image
बीड : वॉकिंग ट्रॅक, बसण्याची सुविधा, खेळण्यासाठी मैदान, खेळणी, हिरवेगार लॉन आणि शोभेसाठीची परंतु सुगंधीत अशी रंगीबेरंगी फुलांची झाडे असणारे सोयी सुविधायुक्त उद्यान पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कर्मचा-यांच्या निवासस्थान परिसरात होत साकारत आहे. याचे काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात याचा लोकार्पन सोहळा पार पडणार आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांसह त्यांच्या पाल्यांना याचा लाभ होणार आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. क्षेत्रीय कार्यालय सोलापूर यांच्या वतीने राज्यात तीन ठिकाणी पोलीस उद्यान विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर, हिंगोली व बीडचा समावेश होता. पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला होता. बीडमध्ये २ जुलै रोजी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या उपस्थितीत या उद्यानाचे भूमिपूजन झाले होते. जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस कार्यरत असणाºया पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना व त्यांच्या पाल्यांसाठी बीडमध्ये सुविधायुक्त उद्यान नव्हते. त्यामुळे त्यांच्या खेळण्यासह इतर समस्यांन

बीडकरांनी पाहिला सुपर ब्लडरेड मून

बीड : तब्बल १५२ वर्षांनंतर दिसणाºया चंद्रग्रहणाचा बुधवारी बीडमधील खगोलप्रेमींनी आनंद लुटत ‘सुपर ब्लड रेड मून’ पाहिला. येथील स्वा. सावरकर महाविद्यालय परिसरात ४ इंची खगोलीय दुर्बिणीतून मून पाहण्याची व्यवस्था केली होती. सायंकाळी साडेपाच वाजेपासून महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थी, पालक, शिक्षक व हौशी खगोलप्रेमींच्या गर्दीने फुलला होता. खगोलप्रेमींनी चंद्रग्रहणाआधीची प्रारंभस्थिती, ग्रहण लागल्यानंतरची मध्य व ग्रहण सुटताना मोक्षस्थिती उत्साहाने अनुभवली. चंद्रावरील खड्डे, विविध अवस्था, ग्रहणातून बाहेर पडतानाचा प्रकाशित भाग पाहून ते खुश झाले. भुगोल विभागाचे प्रा. जोगेंद्र गायकवाड यांनी दुर्बिणची सेटिंग सांभाळत विद्यार्थ्यांना माहिती दिली. उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, भूगाल विभागप्रमुख डॉ. अशोक डोके, प्रा. सुहास जोशी, पुरुषोत्तम मालपाणी, शामसुंदर घाडगे, सावरकर विद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.